“परमेश्वराचे स्मरण हे पर्जन्य व दवबिंदूसारखे असते जे फुलांना व वनस्पतींना ताजेपणा व सौंदर्य देतात, त्यांना पुनरुज्जीवित करतात आणि त्यांना आनंददायी सुगंध व नवे सौंदर्य धारण करण्यास कारणीभूत होतात.”

– बहाई पवित्र लिखाण

भारतातील नवी दिल्ली येथे ‘कमळ मंदिर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बहाई उपासना मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. जगभरातील आठ उपासना मंदिरांप्रमाणे ही भव्य रचना मानवजातीच्या एकतेच्या तत्त्वासाठी उभी आहे. तिच्या परिसरात प्रार्थना आणि ध्यान करण्यासाठी सर्व वांशिक, धार्मिक, राष्ट्रीय पार्श्वभूमीच्या लोकांचे स्वागत आहे. सौहार्दपूर्ण स्नेहभाव वाढवण्यासाठी हे समाजाचे एक सामूहिक केंद्र आहे जिथे प्रत्येकाला समान मानले जाते. सर्व मानवतेचा आणि संपूर्ण विश्वाचा निर्माता असलेल्या एकमेव परमेश्वराला ही वास्तु समर्पित आहे.

बहाई धर्माचे पवित्र लिखाण प्रतिपादन करते की परमेश्वर त्याच्या चैतन्यामध्ये अज्ञात आहे आणि त्याने मानवतेला शिक्षित करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी दैवी संदेशवाहक, अवतार किंवा परमेश्वराची प्रकटीकरणे पाठवली आहेत.

उपासना मंदिर व्यक्ती आणि समुदायांच्या जीवनात प्रार्थनेचे महत्त्व अधोरेखित करते. प्रार्थनेद्वारे आपल्या निर्मात्याशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी एक जागा प्रदान करते ज्याची संकल्पना “प्रार्थना म्हणजे आत्म्याचे जगनिर्मात्याशी कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट होणारे आध्यात्मिक संभाषण” म्हणून केली जाते. आध्यात्मिक आणि भौतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या सामुदायिक जीवनाच्या नमुन्याचा एक मूलभूत घटक म्हणून सामूहिक उपासनेचे महत्त्व अधोरेखित करते. शिवाय, उपासना मंदिरातील भक्तीसेवांचे स्वरुप सार्वत्रिक आहे, मन आणि हृदये परमेश्वराच्या वचनांप्रत उघडून त्यांचे उत्थान करण्यासाठी त्या सर्वांचे स्वागत करतात.

भक्ती हा उपासना मंदिराचा मुख्य सिद्धांत असला तरी मानवतेची सेवा ही उपासनेतून घडणाऱ्या आंतरिक परिवर्तनाची बाह्य अभिव्यक्ती मानली जाते. ही सेवा मानवतेच्या उन्नतीसाठी सेवेच्या भावनेने केलेल्या कृतीतून व्यक्त होते; घरे, परिसर आणि गावांमध्ये होणारी सामूहिक पूजा; एक शैक्षणिक प्रक्रिया जी इतरांची सेवा करण्याची क्षमता निर्माण करते; आणि, सामुदायिक जीवनाच्या नमुन्याद्वारे मानवतेच्या एकतेच्या तत्त्वाला मूर्त स्वरूप देते. अशा प्रकारे, उपासना मंदिर  हे सामाजिक, वैज्ञानिक, शैक्षणिक आणि मानवतावादी सेवांचे केंद्र बनण्याची संकल्पना आहे, ज्यामुळे “परमेश्वराच्या स्मरणाचे उदयस्थान” या शीर्षकानुसार ते त्याचे प्रतिनिधित्व करते.

१९८६ मध्ये सार्वजनिक उपासनेसाठी समर्पित झालेले हे बहाई उपासना मंदिर भारतातील बहाईंच्या राष्ट्रीय आध्यात्मिक संसदेच्या मालकीची मालमत्ता आहे.

बहाई विश्वधर्माच्या मूलभूत तत्त्वांचा परिचय

समुदायांच्या आध्यात्मिक, सामाजिक आणि भौतिक प्रगतीसाठी समर्पित केंद्र

रूपरेषा संकल्पना, त्याचे घटक आणि ऐतिहासिक कालावधी

रूपरेषा संकल्पना, त्याचे घटक आणि ऐतिहासिक कालावधी