भेट देण्यासाठी नियोजन

भेटीच्या वेळा

प्रवेश मोफत आहे.

बहाई उपासना मंदिर मंगळवार ते रविवार सकाळी ८:३० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत उघडे असते.

सोमवारी बंद.

प्रार्थनेच्या वेळा

प्रार्थना सेवेमध्ये वेगवेगळ्या धर्मांच्या पवित्र लिखाणातील प्रार्थना आणि वाचन यांचा समावेश असतो. प्रार्थना सेवेदरम्यान आदर राखण्यासाठी, प्रार्थना सेवा संपेपर्यंत प्रार्थना सभागृहाचे बाहेर पडण्याचे दरवाजे बंद राहतील. प्रत्येक प्रार्थना सेवेचा.

कालावधी: १०-१५ मिनिटे असतो.

वेळ: सकाळी १०, दुपारी २, ३ आणि ५ वाजता

गटागटाने भेट देण्यासाठी

बहाई उपासनागृहाला नियोजित भेट देण्यासाठी १०जणांच्या गटातील अभ्यागतांनी भेटीपूर्वी हा अर्ज भरावा.

  • कृपया तुमच्या भेटीच्या किमान तीन दिवस अगोदर माहिती द्या.
  • शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीसाठी भेटी स्वीकारल्या जात नाहीत.
  • तुमची विनंती मिळाल्यावर, तुमच्याशी पुष्टीकरणासाठी संपर्क साधला जाईल.
  • कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीत, भेट रद्द करण्याचा अधिकार मंदिर व्यवस्थापनाकडे आहे.
  •  

दिशानिर्देश

बहाई उपासना मंदिर कालकाजी, दक्षिण दिल्ली येथील बहापूरच्या शेजारी स्थित आहे. मुख्य गेटसमोरील DDA पार्किंग सुविधा वापरासाठी उपलब्ध आहे. खालील मार्गांनी येथे पोहोचता येते.

मेट्रोने

जवळची मेट्रो स्टेशन्स खालीलप्रमाणे:

  • कालकाजी मंदीर मेट्रो स्टेशन, व्हायोलेट आणि मॅजेंटा लाईनच्या मेट्रोने सेवा केलेले – पूजागृहापर्यंत ५ मिनिटांची चाल.

  • ओखला NSIC स्टेशन, मॅजेंटा लाईनची मेट्रो सेवा – पूजागृहापर्यंत ५ मिनिटांची चाल.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकापासून
  • बहाई उपासना मंदिर नवी दिल्ली रेल्वे स्थानकापासून १५.४ किमी अंतरावर आहे, टॅक्सी-कॅब किंवा ऑटो रिक्षाने अंदाजे ४० मिनिटांचे अंतर आहे.

  • तसेच, नवी दिल्ली रेल्वेस्थानकावरून केंद्रीय सचिवालयाकडे यलो मेट्रो लाईनने येऊन, तेथून व्हायोलेट लाईन घेऊन कालकाजी मेट्रो स्टेशनवर उतरल्यास सुमारे ५०० मीटर चालत जाऊन बहाई उपासना मंदिर ‘लोटस टेंपल’, बहापूर, कालकाजी येथे पोहोचता येते.

विमानतळापासून
  • बहाई उपासनागृह दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळापासून १६.६ किमी अंतरावर आहे, कारने अंदाजे ४५ मिनिटांचे अंतर.  विमानतळावर प्रीपेड कॅब सेवा उपलब्ध आहे  किंवा  खाजगी वाहतूक वापरू शकता – पत्ता: बहाई उपासना मंदिर  ‘लोटस टेंपल’, बहापूर, कालकाजी.
  • IGI विमानतळ – दिल्ली येथील टर्मिनल १ वरून मेट्रो ने देखील जाता येईल. बोटॅनिकल गार्डनच्या दिशेने जाणारी मॅजेन्टा लाईन घेऊन, ओखला NSIC मेट्रो स्टेशनवर उतरल्यास सुमारे ६५० मीटर चालत बहाई उपासना मंदिर ‘लोटस टेंपल’, बहापूर, कालकाजी येथे पोहोचता येते.

इतर माहिती

Maintain physical distance.

Wear a mask at all times.

Thermal screening will be done at the entrance.

Do not touch the railings.

प्रार्थनागृहात पादत्राणे घालण्याची परवानगी नाही. पादत्राणांच्या कोठारात पादत्राणे काढून ठेवता येतात.

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर मुख्य गेटवर व्हीलचेअर उपलब्ध आहेत.

ही सुविधा धूरमुक्त आहे. धूम्रपानास मनाई आहे.

स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे.

आवारात खाद्य-पेयांना परवानगी नाही.

आवारात मोठ्या सामानाला परवानगी नाही.

प्रार्थना हॉल आणि माहिती केंद्र सोडून इतर सर्व ठिकाणी छायाचित्रण करण्याची परवानगी आहे. व्यावसायिक छायाचित्रकारांना पूर्वपरवानगी आवश्यक आहे.

‘हरवले आणि सापडले’ विभाग मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या मुख्य कार्यालयात आहे.

बहाई उपासना मंदिर डिसेंबर १९८६ मध्ये लोकांसाठी खुले करण्यात आले. तेव्हापासून दररोज हजारो लोक मंदिराला भेट देतात. भेट देणारे अभ्यागत शांततेचा आणि प्रसन्न वातावरणाचा आनंद घेतात, ज्यामुळे ध्यानासाठी  योग्य स्थिती प्रचीत होते, ज्यामुळे अनेकजण अशा प्रार्थनास्थळाच्या प्रेरणेचा स्रोत कोणता ते विचारतात. परिणामी, ज्यांना बहाई उपासना मंदिर आणि बहाई धर्माबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यांच्यासाठी माहिती केंद्र नियोजित केले गेले आहे.

माहिती केंद्र हे अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह बांधले गेले आहे आणि ते फोटो पॅनेल, लिखित मजकूर आणि चित्रपटांच्या स्वरूपात बहाई धर्माच्या विविध पैलूंबद्दल माहिती प्रदान करते. केंद्रामध्ये अभ्यागतांची गॅलरी आहे. गॅलरी मध्ये बहाई धर्माचा इतिहास, त्याचे तत्वज्ञान आणि जगभरातील बहाईंनी हाती घेतलेल्या सामाजिक-आर्थिक विकास उपक्रमांवर लक्ष केंद्रित करते. माहिती केंद्रामध्ये ४०० पेक्षा जास्त आसनक्षमता असलेले एक मोठे सभागृह आणि ७०-बैठकांची दोन लहान प्रेक्षागृहे देखील आहेत. सभागृहामध्ये बहाई उपासना मंदिर तसेच बहाई धर्मावरील चित्रपट दाखवले जातात आणि चांगल्या कारणांसाठी आणि सकारात्मक सामाजिक संदेश असलेल्या कार्यक्रमांसाठी वापरला जातो. कलेच्या माध्यमातून एकात्मता वाढवणे हा अशा कार्यक्रमांचा प्राथमिक उद्देश असतो.

याशिवाय, गेल्या काही वर्षांत बहाई समुदायाने समाजाच्या वार्तालापांमध्ये सहभाग म्हणून, संस्कृतीच्या प्रगतीत योगदान देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांच्या एका पैलूचा संदर्भ दिला आहे. माहिती केंद्र हे महिला आणि पुरुष समानता, समाजात धर्माची विधायक भूमिका, सामाजिक उन्नतीसाठी प्रसारमाध्यमांची भूमिका इत्यादी विषयांवर भारतातील बहाईंच्या जनसंपर्क कार्यालयाद्वारे आयोजित केलेल्या चर्चासत्रांसाठी एक ठिकाण म्हणून काम करते.